spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे – सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- निवडणुका या लोकशाहीचा प्रमुख केंद्रबिंदू असून नि:पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन यांनी केले.

स्थानिक शहिद नागेश्वर जिड्डेवार भवन सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक दि.९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमित रंजन, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी शशिकांत बाबर आदी उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पांढरकवडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत बाबर यांनी उमेदवार आणि राजकीय पक्षांनी करावयाच्या खर्चाबाबत व नामनिर्देशन पत्र दाखल करण्याबाबत तसेच परवानग्या बाबत व आचारसंहिता पालनाबाबत मार्गदर्शन केले. सर्वांचे शंकानिरसन बैठकीदरम्यान उपस्थित प्रतिनिधींनी निवडणूक प्रक्रियेविषयी काही प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या, त्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन यांनी सविस्तर शंकानिरसन करून समाधानकारक उत्तर दिले. प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपस्थितांचे आभार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांनी मानले.

Popular Articles