spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विभागीय लोकशाही दिनात एकही नवीन तक्रार नाही

नागपूर :- विभागीय लोकशाही दिनात आज एकही तक्रार प्राप्त झाली नसून प्रलंबित दोन तक्रारींबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अपर आयुक्त सामान्य प्रशासन तेजुसिंग पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विभागीय लोकशाही दिनात नव्याने एकही तक्रार प्राप्त झाली नाही. यावेळी महिला व बालविकास, कृषी, पोलीस, जलसंपदा, कामगार, भूमी अभिलेख आदी विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

यापुर्वीच्या लोकशाही दिनात प्राप्त चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील दोन तक्रारींबाबत पवार यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यास यापुर्वी मागविण्यात आलेल्या अहवालाबाबत विचारणा केली. संबंधित अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यापूर्वी 13 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित विभागीय लोकशाही दिनात चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील दोन तक्रारी प्राप्त झाल्या. यातील पहिल्या तक्रारीनुसार महापालिकेच्या जागेवर अवैध बांधकाम करून अनधिकृतपणे रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. अन्य एका तक्रारीनुसार खाजगी भुखंडाच्या जागेवर महापालिकेने गल्ली रस्ता सोडून रूंद पुल बांधल्याचे प्रकरण आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.