spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त ममता HIMC- प्रोजेक्ट जागृतीतर्फे विशेष उपक्रम

– वंदे मातरम विद्यालय, अवधूत नगर येथे प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर :- राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त ममता HIMC – प्रोजेक्ट जागृती च्यावतीने वंदे मातरम विद्यालय, अवधूत नगर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ममता HIMC च्या राज्य समन्वयिका व कार्यक्रम मार्गदर्शिका योगिता गणवीर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षपद मोहोड यांनी भूषविले, तर विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास इंगोले मान्यवर म्हणून उपस्थित होते.

योगिता गणवीर यांनी ‘मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व व बालविवाह प्रतिबंध’ या विषयावर विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी पोस्टरच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत, शिक्षणच हे बालविवाह निर्मूलनाचे प्रभावी साधन असल्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी बालविवाह व शिक्षणासंबंधी एक प्रभावी व्हिडिओ क्लिपही दाखवण्यात आली, ज्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश मिळाला. त्यानंतर ममता HIMC च्या पल्लवी भांडारकर यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वतःच्या स्वप्नांविषयी प्रेरक विचार मांडले. कार्यक्रमात ८ वी, ९ वी आणि १० वी च्या गुणवंत विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह म्हणून बॅग व कंपास (जिओमेट्री बॉक्स) वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासात भर पडली आणि त्यांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. सरते शेवटी अध्यक्ष मोहोड यांनी मनोगत व्यक्त करत ममता HIMC -प्रोजेक्ट जागृतीच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि संस्थेने अशा शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन पुढेही करत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार अत्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ममता HIMC चे सुपरवायझर योगेश राठोड आणि मंजुषा नासरे यांनी केले.

Popular Articles