spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसंदर्भात बैठक

– सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांना संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई :- रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्याच्या अनुषंगाने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आले.

माजी आमदार प्रमोद जठार यांनी हे स्मारक वेगवेगळ्या टप्प्यात करून ते अधिक भव्यदिव्य व्हावे अशी मागणी केली होती. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर स्मारक उभारावे, अशी सूचना केली होती. याबाबत संकल्पना समजून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी पहिल्या टप्प्यात संकल्पचित्रानुसार मुख्य स्मारकाचे काम करण्याचे निर्देश दिले. तसेच माजी आमदार प्रमोद जठार यांनी मांडलेल्या सूचनेनुसार आजूबाजूच्या परिसरात पर्यटकांसाठी सेवा, सुविधा व विकासाच्या कल्पनांचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशी दिले. प्रस्तावित स्मारक 5 एकर क्षेत्रात उभारले जाणार असून, पार्किंग आणि अन्य सुविधांसाठी अतिरिक्त 2 एकर जागा शासनाने घेतली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीला माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग, रत्नागिरी जिल्हाधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Popular Articles