– आंतरराष्ट्रीय सहकारीता वर्ष 2025 व सहकार सप्ताह 2025
नागपूर :- आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष 2025 या निमित्ताने सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह मुकुंदराव आंबेडकर चौक, एनआयटी कॉम्प्लेक्स समोर, लष्करी बाग नागपूर येथे 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 1 या दरम्यान सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक राजेंद्र घाटे तर अध्यक्ष ॲड. महेंद्र बनसोड यांची उपस्थिती राहतील. कार्यक्रमात प्रशिक्षित म्हणून श्रीकांत दुबे (सी ए) मार्गदर्शन करणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश सातपुते यांची प्रामुख्याने उपस्थिती राहतील. सहकार मेळाव्याचे आयोजन रविवारी 16 नोव्हेंबर रोजी करण्यात आले असून आयोजकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकानी केले आहे.




