spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मॉयल लिमिटेडची ऐतिहासिक कामगिरी, 3 खाणींना प्रतिष्ठित 5-स्टार रेटिंग पुरस्कार प्राप्त

खापा, ११ : देशातील आघाडीची खाण कंपनी मॉयल लिमिटेडने 2023-24 मध्ये भारतीय खाण ब्युरो कडून गुमगाव, कांद्री आणि चिखला खाणींसाठी 5-स्टार रेटिंग पुरस्कार मिळवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा कार्यक्रम 7 जुन रोजी कॉन्व्हेंशनल सेंटर जयपुर राजस्थान येथे संपन्न झाला. पर्यावरण संतुलन, सुरक्षितता, नावीन्य, संसाधनांचा विवेकी वापर आणि सामाजिक जबाबदारी यासारख्या उच्च मानकांच्या आधारे हा सन्मान दिला जातो.

या सन्मान सोहळ्यात राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि भारत सरकारचे कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील आघाडीच्या खाण कंपन्यांच्या उपस्थितीने कार्यक्रम आणखी गौरवशाली बनवला.

मॉयल लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी कंपनीच्या दूरदर्शी विचारसरणी, तांत्रिक कार्यक्षमता आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पणाचे परिणाम म्हणून हे वर्णन केले आणि सांगितले की मॉयल नेहमीच स्थानिक समुदायाच्या शाश्वत विकास आणि कल्याणासाठी वचनबद्ध आहे. ते म्हणाले की हा पुरस्कार केवळ एक कामगिरी नाही तर येणाऱ्या काळात चांगल्या कामासाठी प्रेरणा आहे.

हा अभिमानास्पद सन्मान मॉयलचे प्रतिनिधी आणि संचालक (उत्पादन)  एम.एम. अब्दुल्लाह, कार्यकारी संचालक प्रशांत करैया, सहमहाव्यवस्थापक भुजाडे, चिखला खाण व्यवस्थापक नीलेश खेडेकर, गुमगाव खाण व्यवस्थापक उमेश चरपे आणि कांद्री खाण व्यवस्थापक महेश गायकवाड, संयुक्त महाप्रबंधक (उत्पादन ) व्हि. आर. परिदा, वरिष्ठ प्रबंधक भूविद्यान अनिल सिंग राजपूत, अभिकर्ता संयुक्त महाप्रबंधक (खनन) चिखला खाण यू. एम. भुजाडे, अभिकर्ता संयुक्त महाप्रबंधक बालाघाट खाण, यू. एस. भाटी, मनसर खाण व्यवस्थापक समीर म्हात्रे,  यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

मॉयल लिमिटेडचे हे यश केवळ नागपूर जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही तर भारताच्या खाण उद्योगाला आंतरराष्ट्रीय दर्जाकडे नेण्यासाठी एक प्रेरणादायी उपक्रम आहे. हा पुरस्कार केवळ व्यवसायाप्रती नव्हे तर समाज आणि निसर्गाप्रती संवेदनशील दृष्टिकोन स्वीकारण्याचे प्रतीक बनला आहे


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.