spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले, भूमिपूजन कार्यक्रमावरून झाला वाद

चंद्रपूर :- महानगरपालिका निवडणुकांची चाहूल लागताच शहरात भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमांची रेलचेल वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर रयतवारी कॉलरे परिसरात झालेल्या एका भूमिपूजन कार्यक्रमात तणावाची स्थिती निर्माण झाली.आमदार किशोर जोरगेवार हे एका विकासकामाचे भूमिपूजन करण्यासाठी परिसरात आले असता, काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेश अडुळ यांनी त्यांना कार्यक्रम पार पाडण्यापासून रोखले या घटनेतून वाद चिघळला आणि काँग्रेस कार्यकर्ते तसेच आमदारांसमवेत असलेले भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले.

या दरम्यान शाब्दिक वादविवाद झाला तर काही कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुककी झाली काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नंतर आमदार जोरगेवार यांनी अल्प वेळात भूमिपूजनाची औपचारिकता पूर्ण करून तिथून प्रस्थान केले.

महानगरपालिका निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत चालल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. पुढील काळात अशा आणखी कोणत्या राजकीय चकमकी समोर येतील, याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.