spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ठरलं! बिहारच्या मुख्यमंत्र्याचा उद्या शपथविधी, नितीश कुमार… महाराष्ट्रातून कोण लावणार हजेरी?

बिहारमध्ये नितीश कुमार उद्या दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नितीश कुमार यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. बिहारमध्ये घवघवीत विजयानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा राज्याची सूत्रे हाती घेण्यास सज्ज झाले आहेत. त्यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. आगामी मंत्रिमंडळात किती मंत्र्यांचा समावेश असेल, काही जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी मिळेल की नव्या चेहऱ्यांचा समावेश होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शपथविधीपूर्वी नितीश कुमार राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील. तर या शपथविधीला महाराष्ट्रातून कोण-कोण हजेरी लावणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.

Popular Articles