spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपाच्या ‘पोटोबा फूड स्टॉल’ मधील महिला बचत गटांच्या कार्यशाळेस प्रारंभ

– तीन दिवसीय कार्यशाळेत विविध विषयांवर तज्ज्ञमार्फत मार्गदर्शन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे मनपा मुख्यालयासह विविध झोन मध्ये महिला बचत गटाद्वारा संचालित पोटोबा फूड स्टॉलच्या महिलाकरिता तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेचे शुक्रवारी (ता.२१) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृह येथे समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला बचत गटांना फूड स्टॉल मध्ये आवश्यक असलेली कीटचे वापट करण्यात आले. याप्रसंगी खाद्यतज्ज्ञ विजय जथे, विशाखा पवार, हर्षद मालपे, समाज विकास विभागाचे विनय त्रिकोलवार, रितेश बांते यांच्यासह मनपाचे इतर कर्मचारी आणि बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

कार्यशाळेला मागर्दर्शन करताना समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी सांगितले की, मनपातर्फे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कटिबद्ध आहे. मनपा मुख्यालयात पोटोबा फूड स्टॉल यशस्वी झाल्यानंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली इतर झोन स्तरावर देखील पोटोबा फूड स्टॉल सुरू करण्यात आले आहे. मनपा कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अल्पोपहारासह भोजन उपलब्ध करून देण्याचे कार्य या महिला बचत गटाच्या स्टॉल द्वारे केल्या जाते. त्यामुळे नागरिकांना, मनपा अधिकारी-कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळत असतो. पाटोबा फूड स्टॉल व्यावसायिक दृष्टिकोनातून चालवण्याची गरज असल्याचे ही त्यांनी सांगितले.

पोटोबा फूड स्टॉल वर कार्यरत महिलांना अधिक चांगले दर्जेदार पद्धतीने कार्य करता यावे, तसेच त्यांच्या व्यवसायात अधिक भर पडेल या दृष्टीकोनातून स्टॉल धारकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी खाद्यतज्ज्ञ विजय जथे यांनी फूडस्टॉलच्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता आणि गुणवत्ता सतत राखावी, याबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय विशाखा पवार यांनी पाण्याचा वापर व त्याची गुणवत्ता यावर संबोधन केले. तर हर्षद मालपे यांनी अन्न दुषित होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय यावर मार्गदर्शन केले.

Popular Articles