spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लावणी नृत्यपकार नाही तर महाराष्ट्रात परंपरेची कला – किरण पारधी जि.प. सदस्य

तिरोडा :- लावणी म्हणजे केवळ एक नृत्यप्रकार नाही, तर ती महाराष्ट्राच्या परंपरेची, कलेची आणि लोकभावनांची सुगंधी माळ आहे. ताशा-ढोलाच्या लयीत, तबल्याच्या तालात आणि जीवनाच्या धकाधकीत आनंद शोधणारी ही कला शतकानुशतके लोकांचे मनोरंजन करत आली आहे.

लावणीची परंपरा पेशवाईपासून सुरू झाली. सैनिकांना युद्धकाळात उत्साह देण्यासाठी लावणीचे गायन व नर्तन केले जात असे. नंतर लोकनाट्य तमाशामधून या कलेने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले.असे विचार आपल्या भाषणातून जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी यांनी कोदा अमावास्याला हरिनाम सप्ताह कार्यक्रम प्रसंगी मराठी लावणीचा मंचावरून विचार मांडले या कार्यक्रमाला गावातील सरपंच इंदु पारधी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बबलदास ठाकरे उपाध्यक्ष अजय ढाले , शाळेच्या मुख्याध्यापिका सह शिक्षक व ग्राम पंचायत सदस्य तथा तपोवन धाम समितीचे पदाधिकारी गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते. कोदा अमावास्याला नागरीकांच्या मनोरंजनासाठी विशेष मराठी लावणी कार्यक्रम ठेवण्यात आले होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.