spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नामदेव राठोड यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- तालुक्यातील साहित्यिक नामदेव राठोड यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे तर्फे महात्मा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार रविवार (दि.२३) नोव्हेंबर ला वाणवाडी (पुणे) येथे झालेल्या १९ व्या अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात सुप्रसिद्ध साहित्यिक नामदेव राठोड यांना सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक किशोर टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या मानाच्या सन्मानामुळे साहित्यविश्वात आनंदाची लाट उसळली आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील राठोड यांची निष्ठा, अभ्यास, सामाजिक जाण आणि सातत्यपूर्ण साहित्यसेवा यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. शब्दांना अर्थपूर्ण दिशा देणाऱ्या त्यांच्या लेखणीने समाजातील वंचित, सर्वसामान्य तसेच मानवी मूल्यांचे विविध पैलू प्रभावीपणे उजळवले आहेत. या बहुमोल साहित्यसेवेला ‘साहित्यरत्न’ पुरस्काराने अधिक तेज आला आहे. राठोड यांचे शालेय सहकारी, इष्टमित्र, साहित्यप्रेमी व वाचकप्रिय लेखकवर्ग यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Popular Articles