spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भावसार चौक ते तीननल चौक पर्यंत वाहतूक प्रतिबंधित

– सिमेंटक्रांकीट रस्त्याच्या बांधकामामुळे 9 डिसेंबरपर्यंत वळण रस्त्याची सुविधा

नागपूर :-  शहरातील प्रभाग क्रमांक 19 अंतर्गत असलेल्या रोड क्रमांक 28 (हॉटेल अमिर) भावसार चौक ते नंगा पुतळा तेथून तीन नल चौकापर्यंत सिमेंट कॉक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. यासाठी हा रस्ता डाव्या बाजूने वाहतुकीसाठी प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील वाहतूक आता उजव्या बाजूने वळविण्यात आली आहे. यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आदेश जारी केले आहे. वाहतूक बंद संदर्भातील आदेश येत्या 9 डिसेंबर पर्यंत अंमलात राहणार आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणा-यांना अडचणी होऊ नये, यासाठी या ठिकाणी वळणमार्गाचा (डायव्हर्शन) सूचना फलक रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावण्यात आले आहे.

आदेशात कामाचे ठिकाणी सुचना फलक व काम सुरू केल्याची/ काम पूर्ण करण्याची दिनांक नमूद करावे. तसेच कंत्राटदाराने स्वतःचा पत्ता व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक असलेला बोर्ड लावावा. पर्यायी मार्ग सुरू होतो. त्याठिकाणी दोन्ही टोकावर तसेच बॅरीकेटस जवळ रोडवर आपले वाहतुक सुरक्षा रक्षक/ स्वयंसेवक नेमावे. वाहतुक सुरक्षा रक्षक, वाहतूक चिन्हांच्या पाटया, कोनस्, बॅरीकेटस् दारी रिफ्लेक्टिव्ह जॅकेटस् एज.ई.डी. बॅटन, ब्लिकर्स, इत्यादी संसाधने उपलब्ध करावे, काम सुरू झाल्यांनतर जमिनीतून निघणारे मटेरियल उदा. माती, गिट्टी, पेव्हर ब्लॉक, वगैरे मुळे घसरण निर्माण होवून वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे रस्त्यावर टाकु नये. त्याकरिता विशेष व्यवस्था करण्यात यावी. मार्गावरील रस्त्यावर झालेले खड्डे तात्काळ बुजवून त्यावर सिमेंटीकरण /डांबरीकरण करून रोड पूर्ववत करावा. पर्यायी मार्ग सुरू होतो, त्याठिकाणी व काम करणार आहे. त्या मार्गाचे बाजुला लोकांना दिसेल अशा ठिकाणी पर्यायी मार्गाबाबत (वळण मार्ग) सविस्तर माहिती असणारे फलक लावण्यात यावेत. रात्रीचे वेळी वाहनचालकांना माहितीकरिता एलईडी. डार्यव्हर्सन बोर्ड लावणे आवश्यक आहे. बॅरीकेटींगवर एलईडी माळा लावणे आवश्यक आहे. काम सुरू असतांना अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतूक नियमांचे तसेच वाहतूक पोलीसांनी दिलेल्या दिशा-निर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांच्या सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.

Popular Articles