spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चला ग्रामगीता वाचू या ! 28 नोव्हेंबर रोजी दिघोरीत

नागपूर :- श्री गुरूदेव सेवा बुहुउद्देशीय संघ, नागपूर चला ग्रामगीता वाचू या हा कार्यक्रम उत्साहात साजरा होणार विद्यार्थ्यांच्या अंगी चारिन्य, संस्कार व्यवहारिकता व जीवनमुल्ये रूजावी यासाठी श्री गुरूदेव बहुउद्देशीय संघ नागपूर या संस्थेव्दारे शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता. “चला ग्रामगीता वाचू या” हा कार्यक्रम बिरसा नगर, एन.आय.टी. गार्डन, दिघोरी, नागपूर येथील पटांगणात उत्साहात साजरा होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांसाठी ग्रामगीतेतील जीवन शिक्षण पाठाचे वाचन करण्यात येणार आहे व राष्ट्रवंदना घेण्यात येणार आहे. तसेच ज्ञारेश्वर रक्षक, राधेश्याम निमजे, शांतीदास लुंगे, मानिक मुळेकर या विचारवंतांचे ग्रामगीते विषयी मार्गदर्शन होणार आहे व सर्व विद्यार्थ्यांना जीवन शिक्षण विषयक एक पुस्तक भेट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सप्तखंजिरी वादक राष्ट्रीय किर्तनकार मोहनजी चोरे यांचे ग्रामगीतेवर आधारीत किर्तन होणार आहे. याप्रसंगी विशेष आमंत्रित मोहन मते (आ.दक्षिण नागपूर), अभिजीत वंजारी (आ.पदवीधर मतदारसंघ, दक्षिण नागपूर), गिरीष पांडव (सचिव, राधिका पांडव चॅरिटेबल ट्रस्ट, नागपूर), (खंडविकास अधिकारी पवनी) अतुल लोंढे , किशोर कनेरे, कीशोर कुमेरिया, शेखर सावरबांधे, पिंटू झलके, मंगला गवरे, रेखा साखोरे, निलेश माने तसेच बरेच नामवंत मान्यवर, विविध भजन मंडळे, बहुसंख्य शाळा, प्रमुख संस्था उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे प्रमुख कैलाश मलवंडे तसे दामोदर दिवटे, डॉ. प्रमोद माळवे यांनी केले आहे.

Popular Articles