spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संविधानाच्या खरा जागर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनीच केला – प्रविण आवळे

नागपूर :- या देशाला संविधान मिळून सत्तर पंचातर वर्षे झाले परंतु आजपण दऱ्याखोऱ्यात गाव कुसऱ्यात, झोपडपट्टयात आजपण संविधानाची विकास रूपी किरणे यांच्या दरवाजा पर्यंत पोहोचली नाही जे काही संविधानाचे जागर झाले असेल ते फक्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनीच केले याचे खरे श्रेय जाते असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रवीण आवळे यांनी केले ते आज संविधान दिनानिमित्त संविधान चौक येथे कार्यकर्ते सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला आंबेडकरी महिला मोर्चाच्या महिला नेत्या डॉ सुधा जनबंधू यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.

या प्रसंगी आंरिमो चे राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, प्रदेश उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे, जेष्ठ नेते मामासाहेब मेश्राम, जयदेव चिंवडे,प्रा.रमेश दुपारे,शालिक बांगर, सुशिला जनबादे, अर्चना राडे, सुजाता रामटेके, वैशाली तभाने, प्रकाश कांबळे, मनोहर इंगोले, हे होते या प्रसंगी आंरिमो चे प्रदेश नेते धर्मा बागडे यांनी संविधान अमर रहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो या घोषवाक्यांनी परिसर दणाणून सोडले.कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles