खापा :- शादाब एज्युकेशन सोसायटी , नागपूर द्वारा संचालित हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालय, ताजाबाद शरीफ, उमरेड रोड, नागपूर, विद्यार्थ्यांची पंचवटी वृद्धाश्रम, उमरेड रोड, दिघोरी , नागपूर येथे दिनांक २४/११/२०२५ ला शैक्षणिक भेट देण्यात आली. या वृद्धाश्रमाच्या प्रमुख विभा टिकेकर यांनी १९६१ पासून सामाजिक बांधीलकी जोपासून वृद्धाश्रम सुरळीत चालविलेला. येथील वृद्धांना वैद्यकीय, मनोरंजन,योगा ध्यानसाधना, जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचा मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाच्या सुरवातीला सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा गायधने यांनी येथील सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अ. शकील, अ. सत्तार यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. विनोद शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ . मीनाक्षी इंगळे यांनी केले. महाविद्यालयाच्या माध्यमातून वृद्धाश्रमातील लाभार्थ्यांना फळांचे व बिस्किटांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी पंचवटी वृद्धाश्रमाच्या प्रमुख विभा टिकेकर, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा गायधने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अ. शकील, अ. सत्तार, डॉ. वीरेंद्र आदमने, डॉ. सुभाष धोटे, डॉ. सुरेश काळे, डॉ. मीनाक्षी इंगळे, डॉ. विनोद शेंडे, डॉ. सुनिल अखंडे, प्रा. अर्पित थूल, प्रा. रेणू तिवारी, डॉ. सतीश बोबडे, प्रा. राजश्री मेश्राम, प्रा. उपेंद्र गुप्ता तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.




