– मनपा ने प्रभाग ३० चे मतदार यादीतले नावे प्रभाग क्रमांक 32 मध्ये स्थानांतर केले ! असा आरोप अनिल शाहू
नागपूर :- शिवसेना प्रणित महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना तसेच ज्येष्ठ नागरिक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष सिद्धू भाऊ कोमजवार यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ता अनिल शाहू यांनी पत्रकारांना माहिती दिली की नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 30 चे मतदार यादीत घोळ झालेला आहे. प्रभाग 30 मधील मतदार यादीची नावे प्रभाग क्रमांक 32 मध्ये स्थानांतरित केल्या गेले. यासंदर्भात त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. सदर पत्रपरिषद नागपूरच्या मतदारांना या विषयावर जागृत करण्यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यामातून जागृत करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक अनिल शाहू यांनी पुढाकार घेतला. यावेळी सिद्धु कोमजवार, अनिल शाहू, विजयराव कडू आणि आशीर्वाद नगर चे ज्येष्ठ नागरिक वामन साळवे यांची उपस्थिती होती.




