नागपूर :- महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने काॅटन मार्केट चौक नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ रजिस्टर महाराष्ट्र तर्फे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच ह्या प्रसंगी महात्मा फुले दांपत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी देण्यासाठी गेल्या २६ वर्षांपासून उदासीनता व टाळाटाळ होत आहे त्याचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आली आम्ही दरवर्षी महात्मा फुले व ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करून भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची मागणी केली जाते व जिल्हाधिकारी नागपूर मार्फत लेखी निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री यांना निवेदन पाठवून मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने सन २०/११/२०००, २०१५ व २०२५ ला जे जे मुख्यमंत्री होते त्यांनी प्रस्ताव व ठराव मंजूर करून केंद्र सरकार ला पाठविला पंरतू दुर्दैवाने सांगावे लागते की आश्वासन दिले जाते पुर्तता होत नाही आता जानेवारी २०२६ मध्ये जाहीर करून त्याचे वंशज निता रमाकांत होले राहणार पुणे ह्यांना देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण संघ रजिस्टर महाराष्ट्र तर्फे सरचिटणीस, अखिल भारतीय सर्वे वर्गीय कलार समाज तर्फे अध्यक्ष, राष्ट्रीय ओ बी सी मुक्ती मोर्चा महाराष्ट्र तर्फे संयोजक, महात्मा फुले सामाजिक न्याय परिषद महाराष्ट्र तर्फे मुख्य संयोजक व माजी उपाध्यक्ष भाजपा नागपूर शहर व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार्थी भूषण दडवे व इतर संघटना मार्फत करण्यात येत आहे
महात्मा फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारची गेल्या 26 वर्षपासून उदासीनता व टाळाटाळ त्यासाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन









