नागपूर :- बेसा रोड येथील बालपांडे काॅलेज रोड स्वामी समर्थ मंदिर जवळ असलेल्या आंनद को ऑप हाऊसिंग सोसायटीच्या नागरिकांनी आपल्या समस्या सांगुन तिथे असलेली झाडे तोडायला सांगीतली आणि मी ज्योती मधुकर कुमरे बेसा पिपळा नगरपंचायत प्रभाग 9 मधुन उभी असल्यामुळे त्याच्या समस्यांची पुर्तता करुन कामाला सुरवात केली. त्याच बरोबर जे खाली प्लाॅट आहे. तिथे सांड पाणी जमा होते त्याचे पण काम मार्गी लावले. अशा खुप काही प्रभागातील 9 मधल्या नागरिकांची समस्या आहे. मला राष्टवादी काग्रेस पार्टीचे अजित दादा पवार गट यांच्या प्रोत्साहाने मला हिंमत मिळाली आणि मी प्रभाग क्रमांक 9 मधल्या नागरिकाची सेवा करण्यासाठी मिळाली काही भागात कचऱ्याची गाडी येत नाही काही भागात रस्ता बनलेला नाही त्याच्या घरासमोर पाणी साचते तर माझ्या प्रभाग 9 च्या नागरिकांनी मला प्रचंड बहुमतानी विजयी करावे माझे बोध चिन्ह आहे घडी चिन्हावर बटन दाबून मला जिंकून आणावे. अशी मी नम्र विनंती करते. मी सदैव तुमच्या सवेत राहील. असे प्रसिद्धी पत्रकात कार्यकर्ते अजय राऊत यांनी कळविले.








