spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुक्तांगणा ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण महिला परिवार व्दारे नवरात्रौत्सव थाटात साजरा

– नऊ दिवस नऊ देवीच्या प्रतिमेचे पुजन, भजन करून नऊ प्रभागातील नऊ महिला व्दारे आरती. 

कन्हान :- मुक्तांगणा ग्रामौन्नती सेवा प्रतिष्ठाण महिला परिवार व्दारे ” शिवरत्न ” कार्यालय विवेकांनद नगर कन्हान येथे नऊ दिवस नऊ प्रभागातील महिला भजन मंडळ व्दारे भजन करून नऊ देवीच्या प्रतिमेचे पुजन, करून नऊ प्रभागातील नऊ सुवाशिनी महिला व्दारे आरती करित प्रसाद वितरण करून भक्ती व शक्तीचे प्रतिष्ठाण ” नवरात्रौत्सव ” आगळावेगळा भावपुर्ण धार्मिक कार्यक्रमाने थाटात संपन्न करण्यात आला.

रविवार (दि.११) ऑक्टोंबर ला सायंकाळी ४ वाजता मातोश्री भजन मंडळ विवेकानंद नगर कन्हान चा भजनाचा कार्यक्रम करून सायंकाळी ७ वाजता प्रभाग क्र. ८ च्या नऊ सुवाशिनी महिलांच्या हस्ते आर ती करून प्रसाद व साबुदाण्याची खिचडी उपस्थित सर्व भाविकांना वितरण केली. सोमवार (दि.१२) ला सायंकाळी ४ वाजता माऊली भजन मंडळ लोहिया लेआऊट प्रभाग क्र. ५ चे भजन करून प्रभागातील नऊ सुवाशिन महिलांच्या हस्ते आरती करून प्रसाद व साबुदाना खिचडी सर्व उपस्थित वितरण केली. असेच मंगळवार (दि.१३) ला साई भजन मंडळ इंदिरा नगर कन्हान प्रभाग क्र. २ च्या नऊ सुवाशिन महिलांच्या हस्ते आरती, बुधवार (दि.१४) ला रुखमिनी भजन मंडळ गणेश नगर कन्हान प्रभाग क्र. ४ च्या नऊ सुवाशिनी महिलांच्या हस्ते आरती, गुरूवार (दि.१५) ला शारदा भजन मंडळ शिवनगर कन्हान चे भजन प्रभाग क्र.३ च्या सुवाशिनी महिलांच्या हस्ते आरती, शुक्रवार (दि. १६) ला सायंकाळी ४ ते ५.३० शिवशक्ती भजन मंडळ हनुमान मंदीर टेकाडी आणि ५. ३० ते ७ वाजे पर्यंत शिवशक्ती भजन मंडळ हनुमान मंदीर टेकाडी यांचा भजनाचा कार्यक्रम आणि प्रभाग क्र. ९ च्या सुवाशिनी महिलांचे हस्ते आरती, शनिवार (दि.१७) ला जय दुर्गा भजन मंडळ पिपरी प्रभाग क्र. ७ यांचे भजन आणि प्रभागातील नऊ सुवाशिनी महिलांच्या हस्ते आरती, रविवार (दि.१८) ला सायंकाळी ४ ते ५. ३० आत्मसमर्पन माऊली भजन मंडळ टेकाडी आणि ५. ३० ते ७ वाजे पर्यंत सहेली भजन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम आणि प्रभाग क्र. १ च्या नऊ सुवाशिनी महिलांच्या हस्ते आरती. सोमवार (दि.१९) ला सायंकाळी ५ ते ७ रामकृष्ण भजन, जस मंडळ रायनगर, सौ. रंजना सरोदे यांचा भजनाचा कार्यक्रम करून प्रभाग क्र.६ च्या नऊ सुवाशिनी महिलांच्या हस्ते देविच्या नऊ प्रतिमेचे पुजन प्रसाद, साबुदाण्याची खिचडी आणि केळीचे सर्व उपस्थिताना वितरण करून मुक्तांगणा च्या महिलांनी गरबा खेळुन नवरात्रौत्सव थाटात संपन्न करण्यात आला. नऊ ही दिवस माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव व पत्नी कल्पना जाधव सह नऊ प्रभागातील भाविक महिला, पुरूषांनी उपस्थित राहुन नऊ दुर्गा मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला.

Popular Articles