मुंबई १२ : रमाबाई आंबेडकर नगर (घाटकोपर) येथील हत्याकांडातील शहीद भीमसैनिकांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे आज आदरांजली अर्पण करण्यात आली. मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर येथे 11 जुलै 1997 रोजी झालेल्या अमानुष गोळीबारात हौतात्म्य पत्करलेल्या भीमसैनिकांना शुक्रवारी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप भाई कवाडे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण आणि सामूहिक बुद्धवंदना घेऊन झाली. याबाबत माहिती प्रदेश संघटक कपिल लिंगायत यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टी मुंबई अध्यक्ष विजय वाघमारे, मुंबई कार्याध्यक्ष विलास निकाळे, मुंबई उपाध्यक्ष आनंद शिंदेकर, मुंबई उपाध्यक्ष राम भाऊ वाघ, मुंबई सचिव राजवीर सिंग टीवाल, ईशान्य जिल्हा संघटक विशाल गौतम कोकाटे, पवई वार्ड प्रमुख डी.डी. वाघमारे, कलिना विधानसभा अध्यक्ष विनोद जाधव, कलिना मनीपाडा विभागातील राजू शिंदे, विलेपार्ले तालुका क्रिश्चन आघाडीचे डॉनल्ड रोशन, वाकोला शाखा उपाध्यक्ष रवी वाघमारे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ता यशवंत साळवे तसेच महिला कार्यकर्ता अरुणा दुमळे, शशिकला जाधव, दिपाली चव्हाण, मनश्री तांबे आणि लिंबोणी अहिरे यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना जयदीप कवाडे म्हणाले, 11 जुलै 1997 रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि त्यानंतर घडलेला गोळीबार हा केवळ घटना नसून दलित समाजावरील भीषण अत्याचाराची परिसीमा होती. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, रमाबाई आंबेडकर नगरातील हत्याकांड म्हणजे सरकारने शासकीय यंत्रणांच्या मदतीने केलेला क्रूर आणि योजनाबद्ध नरसंहार होता. या घटनेत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, अनेकांना प्राण गमवावे लागले. जयदीप कवाडे म्हणाले, ज्यांनी वर्गणी गोळा करून बाबासाहेबांचा पुतळा उभा केला, त्यांनाच पोलिसांनी पुतळा विटंबनेच्या गुन्ह्यात अडकवले. त्यांच्यावर खटले चालवले गेले. आज 28 वर्षे उलटली तरी रमाबाई आंबेडकर नगरातील पीडित कुटुंबे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. हा अन्याय आजही आंबेडकरी समाज विसरलेला नाही. अन्यायाविरुद्धचा संघर्ष सुरूच राहील, असेही जयदीप कवाडे त्यांनी ठामपणे सांगितले. कार्यक्रमाला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडातील न्याय अद्याप अपुरा : जयदीप कवाडे


शहिद भीमसैनिकांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे अभिवादन
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.




