spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कांकरेज: देशातील सर्वोत्तम गोवंशापैकी एक प्रजाती

– १२० दिवस दुधाचे सेवन केल्यास कॅन्सर पासून मुक्ती

– कांकरेज गोवंश प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- भारतीय गायीमधील प्रथम बघताचक्षणी प्रेमात पडावे असा लोभस गोवंश म्हणजे कांकरेज गोवंश होय. कांकरेज प्रजातीतील नंदीबैल हा आपल्या देशातील सर्वोत्तम गोवंशापैकी एक आहे. या वंशाच्या बैलांना धिप्पाड शरीर लाभले असते. गोपालबांधव याच प्रजातीय बैलांचा नंदी म्हणून फार पूर्वीपासून वापर सुरू आहे. कांकरेज हा देशी गोवंश गुजरातमधील कच्छ रणभागात मोठ्या प्रमाणात आढळतो. प्रेमळ, सशक्त व दररोज सात लिटर दूध देण्याची क्षमता अशी तिची वैशिष्ट्ये आहेत. मात्र योग्य काळजीच्या अभावामुळे ही प्रजाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा शासनाने गांभीर्याने दखल घेत गोवंशाची प्रजाती विलुप्त होण्यापासून वाचवावी. अशी मागणी रामटेक शितलवाडीचे पशुप्रेमी प्रा. प्रकाश कस्तुरे यांनी केली आहे. कांकरेज जातीच्या गाईचे दूध ओ-२ प्रकारचे सर्वाधिक पौष्टिक आणि आरोग्यदायक दूध असते, हे शास्त्रीय प्रयोगातून सिद्ध झाले आहे. सतत १२० दिवस या दुधाचे सेवन केल्यास कॅन्सर पासून मुक्ती मिळते. परंतु गोपालाकांकडून या प्रजातीच्या बैल आणि गाईंची योग्य ती काळजी घेतली जात नाही. त्यामुळे कांकरेट प्रजातीचे गाई- बैल विलुप्त श्रेणी मध्ये जाण्याचे संकट उभे ठाकले आहे. त्या पेक्षाही वाईट बाब म्हणजे जीवाची बाजी लावून या गोवंशाचे जतन करणार्‍या गोवंशज पालकांची स्थिती जास्तच विदारक आहे. भटकी जमात असल्याने त्यांच्यासाठीच्या शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे मुलांचे शिक्षण, नोकर्‍या, व्यवसाय, स्थिर जीवन या संबधी अनेक समस्या आहेत.अचानक अशाच एका नंदीबैल पालकाची भेट झाली. त्यांची दुरावस्था त्यांच्या सोबत चर्चा करून लक्षात आली. खरोखर, ही कांकरेज प्रजाती आणि त्यांचे पालन करणारे गोपाल दोघांना सुद्धा मदतीची तीव्र गरज आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.