spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शिवप्रिया तीर्थ केतापार येथे ईश्वरीय अनुभूती दिवस रौप्य महोत्सवा निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन ५ डिसेंबर रोजी

नागपूर :- शिवप्रिय उद्योग समूह, प्रिया विद्या विहार इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, शिवप्रिया आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे शिवप्रिया तीर्थ केतापार कळमेश्वर येथे ईश्वरीय अनुभूती दिवसाच्या आयोजन केलेले आहे यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाले तसेच ईश्वरीय अनुभूती दिवसाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. येत्या शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी ईश्वरीय अनुभूती रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने समाजोपयोगी व लोक जागृती करणारे समाजप्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम तीन सत्रांमध्ये होणार असून पहिल्या सत्रात महिलांच्या कलश व वृक्षदिंडींचे स्वागत ज्यातून झाडे पाणी व माती वाचविण्याचा संदेश देण्यात येणार आहे. त्यानंतर शिवप्रिया आयुर्वेदिक हॉस्पिटल केतापार यांचे तर्फे आरोग्य तपासणी नेत्र तपासणी करण्यात येईल. शिबीरांमध्ये रुग्णांसाठी नेत्ररोग तपासणी उपचार काचबिंदू निदान व उपचार दुर्बिणीद्वारे डोळ्यांची शस्त्रक्रिया, कम्प्युटर द्वारे डोळ्यांची तपासणी डोळ्यांच्या मासांवरील उपचार व बिना टाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. पत्रपरिषद प्रतिभा शिंदे, किशोर भागडे व मनीषा देव यानी संबोधित केले. कार्यक्रमाच्या तिसऱ्या व अंतिम सत्रात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार सप्त खंदेरी वादक सत्यपाल महाराज यांचे समाज प्रबोधनपर जाहीर कीर्तन राहील. या कार्यक्रमाला प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या ब्रह्मकुमारी रजनी व मनीषा यांची प्रामुख्याने उपस्थिती राहतील हे सुद्धा त्यांनी पत्रकारांना सांगितले. पत्रपरिषदेमध्ये उपस्थित मंचावरील स्वाती मांगलकर, श्वेता खोब्रागडे, वैशाली कुर्वे, प्रिया देवतळे, कल्पना पालमवार, नरेंद्र गुरव, सुरेश नितनवरे, अतुल जाधव, आणि राजेंद्र पडोळे यांची उपस्थिती होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.