spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

माझी वसुंधरा अभियान उत्कृष्ट लेखनासाठी पत्रकारांना पुरस्कार

– 30 एप्रिल पर्यंत प्रस्ताव स्वीकारणार

नागपूर :-  माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थानमध्ये पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित केलेल्या कामासंदर्भात प्रिंट आणि डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी राज्यस्तरावर व विभागीय स्तरावर पारितोषिक स्पर्धा राबविण्यात येत आहे. माझी वसुंधरा अभियानासंदर्भात दिनांक 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत प्रसिद्ध केलेले लेख, बातम्यांच्या अनुषंगाने प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहे.

माझी वसुंधरा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर व विभागीयस्तरावर पारितोषिके देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने जागतिक पर्यावरण दिनी म्हणजेच 5 जून रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी वर्तमानपत्रात तसेच डिजिटल मिडियावर दिनांक 1 एप्रिल ते 30 एप्रिल या 30 दिवसात नामनिर्देशन (प्रस्ताव) मागविण्यात येत असल्याची माहिती अपर आयुक्त विकास वर्षा गौरकर यांनी दिली.

नागपूर विभागातील सर्व प्रिंट मिडिया व डिजिटल मिडियातील प्रतिनिधींना ‘माझी वसुधंरा अभियान 6.0’ अंतर्गत या पुरस्कार योजनेत सहभाग नोंदविता येईल. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी विभागीय नियंत्रण अधिकारी म्हणून संकेत तालेवार (भ्रमणध्वनी क्रमांक – 9158786672) माझी वसुंधरा अभियान व वातावरणीय कृती कक्ष विभागीय आयुक्त कार्यालय येथे संपर्क करता येईल.

पत्रकारांसाठी पुरस्कार योजनेत राज्यस्तरावरील प्रिंट मिडिया 3 बक्षिसे तसेच डिजिटल मिडियासाठी 3 बक्षिसे आहेत. विभागीयस्तरावर प्रिंट मिडियासाठी प्रत्येक महसूल विभागासाठी 3 बक्षिसे तसेच डिजिटल मिडियासाठी 3 बक्षिसे आहेत. दिनांक 1 ते 30 एप्रिल 2026 कालावधीत प्राप्त झालेले प्रस्ताव विभगाअंतर्गत गठित समितीमार्फत तपासून पुरस्कारासाठी अंतिम राहतील.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.