नागपूर :- भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्याच्या विधानसभेत २६ मार्च २०२५ रोजी झालेल्या “भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल” या विषयावरील चर्चेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरादाखल केलेले भाषण पुस्तक रुपात येत्या ९ डिसेंबरला प्रकाशित होणार आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी लोक भवन येथे सायंकाळी साडेसहा वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र विधिमंडळ व वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या पुढाकारातून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या सोहळ्याचे आयोजन शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील लोक भवन येथे करण्यात आले असून प्रवेश केवळ निमंत्रितांसाठी असल्याचे संबंधितांनी कळविले आहे.




