spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ठकवणुक करणाऱ्या पाहीजे आरोपीस केले अटक मौदा पोलीसांची कामगिरी

मौदा :- पोलीस स्टेशन मौदा येथे फिर्यादी प्रिती प्रेमदास कुरजेकर, रा. मौदा, जि. नागपुर यांनी पो.स्टे. ला येवुन तक्रार दिली की, फिर्यादी यांचे घरातील किरायदार नामे संजय भिमराव काठोळे, वय ३५ वर्षे, रा. वरुड, जि. अमरावती यांनी पैसे व सोने डबल करुन देण्याचे आमीष दाखवुन एकुण २,२६,०००/- रुपये ठकवणुक करुन घेवुन गेले आहे. अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन मौदा येथे कलम ३१८ भा.न्या.सं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा केल्यानंतर नमुद आरोपी हा पळुन गेला होता.

वरीष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मौदा पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाने तांत्रिक पुराव्याच्या अधारे दिनांक ०७/१२/२०२५ रोजी आरोपी संजय भिमराव काठोळे, वय ३५ वर्षे, रा. वरुड, जि. अमरावती यास उमरेड येथुन ताब्यात घेतले. सदर आरोपीस गुन्हयाबाबत सखोल विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीकडून गुन्हयातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम १५०००/-रूपये असा एकुण १,४१,५००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असुन मा. न्यायालयाने दिनांक ०९/१२/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.