उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर, ता. ११: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. बुधवार (ता.११) रोजी शोध पथकाने ५० प्रकरणांची नोंद करून ३९,१००/- रुपयाचा दंड वसूल केला.
हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४०० /- दंड) या अंतर्गत २३ प्रकरणांची नोंद करून ९,२००/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.१००/-) या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून 200/- रूपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. ४००/- दंड) या अंतर्गत ११ प्रकरणांची नोंद करून ४,४००/- रुपयांची वसुली करण्यात आली.
मॉल,उपहारगृहे,लॉजिंग, बोर्डिंगचे हॉटेल सिनेमाहॉल,मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्त्यावर कचरा टाकणे (रू.२,०००/-) या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ४,०००/- रूपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १२ प्रकरणांची नोंद करून ९,५००/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटण विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.१०००) या अंतर्गत १ प्रकरणाची नोंद करून १,००० रुपये दंड वसूल करण्यात आला. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास १४ प्रकरणांची नोंद करून २,८००/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ८ प्रकरणांची नोंद करून ८,००० /- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.


तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या मे. वरदा इन्फ्रा व मे. क्रिष्णा ऑरकीड यांनी बांधकामाचा कचरा रस्त्यालगत टाकल्याप्रकरणी प्रत्येकी रु. १०,०००/- या प्रमाणे एकूण २०,००० /- रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे.साईबाबा फ्रुट सेंटर यांच्याकडून प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. ५,०००/- चे दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत येणाऱ्या मे.करण बिल्डर्स यांच्यावर रस्त्यालगत बांधकामाचा कचरा टाकल्याप्रकरणी १०,०००/- रूपयांची वसुली करण्यात आली. तसेच वसंत खळतकर बिल्डर्स यांच्यावर रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्याप्रकरणी रु. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. स्वस्तिक स्वीटस यांच्याकडून प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. ५,०००/- रुपयांचा दंड वसुल केला. तर मे.किडझी प्री स्कूल यांनी विनापरवानगी विदयुत खांबावर फलक लावल्याबददल रू.५०००/- रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. कमलेश किराणा स्टोअर्स यांच्याकडून प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. लकडगंज झोन अंतर्गत मे. स्काय लाईन इन्फ्रा यांच्याकडून रस्त्यालगत कचरा पसरविल्या प्रकरणी कारवाई करीत रु. १००००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. तर मंगळवारी झोन अंतर्गत मे.बाबुजी ट्रेडर्स व मे.सदर डिस्पोजल प्रत्येकी रू.५०००/- या प्रमाणे रू.१००००/- रूपयांचा दंड वसूल करण्यात आले. तसेच जहांगीर आलम यांनी रस्यावर माती टाकल्याप्रकरणी रू.५०००/- दंड वसूल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने १२ प्रकरणांची नोंद करून रू. ८०,०००/- दंड वसूल केला.





