Related Posts

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे आयोजन

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> राज्यात मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत असलेल्या&&num;8217&semi; महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण&&num;8217&semi; या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व कारागृहांमध्ये बुधवारी 10 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे&period; &&num;8216&semi;महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग &&num;8216&semi;ही राज्यातील मानवी हक्कांबाबत कायदेशीर कारवाई करणारी संस्था आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>10 डिसेंबर 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने &&num;8216&semi;मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा&&num;8217&semi; &lpar;यूडीएचआर&rpar; स्वीकारला होता&period; म्हणूनच 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्कांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी साजरा होतो&period; कैद्यांना त्यांच्या कारावासातील कालावधीत त्यांचे जीवन&comma; समता&comma; सन्मान आणि स्वातंत्र्याबद्दलचे कायदेशीर अधिकार कळावेत&comma; याकरिता हा जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए&period; एम&period; बदर यांच्या संकल्पनेतून&comma; सदस्य न्यायमूर्ती&comma; स्वप्ना जोशी&comma; संजय कुमार &lpar;भापोसे&rpar; यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील सर्व कारागृहांत &&num;8216&semi;कैद्यांचे मानवी हक्क आणि संरक्षण&&num;8217&semi; या विषयी माहितीपुस्तिकेचे वाटप आणि मार्गदर्शन करून कायदेविषयक जागृती करण्यात येणार आहे&period; महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव प्रदीपकुमार डांगे &lpar;भाप्रसे&rpar; आणि महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा या संस्थेचे अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुहास वारके &lpar;भापोसे&rpar; तसेच विजय केदार&comma; निबंधक&comma; महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यातील सर्व प्रमुख जिल्हा न्यायाधीश&comma; जिल्हाधिकारी&comma; पोलीस अधीक्षक&comma; पोलीस आयुक्त&comma; कारागृह प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;