Related Posts

प्रधानमंत्री धनधान्य योजनेमार्फत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार – केंद्रीय नोडल अधिकारी मुथू कृष्णन शंकर नारायण 

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेअंतर्गत जिल्हास्तरावरील आराखड्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय नोडल अधिकारी मुथू कृष्णन शंकर नारायण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे दिनांक 9 डिसेंबर रोजी बैठक घेण्यात आली&period; प्रधानमंत्री धनधान्य योजनेमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असे प्रतिपादन केंद्रीय नोडल अधिकारी मुथू कृष्णन शंकर नारायण यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीत जिल्ह्यातील कृषी उत्पादनक्षमता वाढविणे&comma; पिकांचे विविधीकरण&comma; शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार&comma; बँकमार्फत कर्जपुरवठ्याची सुलभता&comma; शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करणे&comma; काढणीनंतरच्या तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन&comma; गोडाऊन क्षमता वाढविणे तसेच प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारणी यांसारख्या विविध घटकांचा आढावा केंद्रीय नोडल अधिकारी मुथू कृष्णन शंकर नारायण यांनी घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्हा आराखडा तयार करताना शेतकरी&comma; शेतकरी गट&comma; शेतकरी उत्पादक कंपनी तसेच महिला बचत गट यांना केंद्रस्थानी ठेवून योजना राबवावी&comma; तसेच प्रधानमंत्री धनधान्य योजना विविध विभागांच्या अभिसरण तत्वावर राबविण्यात येणार असून प्रत्येक विभागास भौतिक व आर्थिक लक्षांक देण्यात येणार आहेत&period; त्या अनुषंगाने योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागांना दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की&comma; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प संचालक &lpar;आत्मा&rpar; संतोष डाबरे&comma; जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण&comma; विभागीय संशोधन केंद्राचे डॉ&period; अमर शेट्टीवार व अग्रणी बँकेचे व्यवस्थापक&comma; कृषी विज्ञान केंद्र&comma; सांगवी रेल्वेचे प्रमुख शास्त्रज्ञ तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;