– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.गुरूवार(ता.11) शोध पथकाने 76 प्रकरणांची नोंद करून 30,900 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 35 प्रकरणांची नोंद करून 14,000 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 100 रूपयांची वसुली करण्यात आली.दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून 1,600 रूपयांची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 12 प्रकरणांची नोंद करून 8,000 रुपयांची वसुली करण्यात आली.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 21 प्रकरणांची नोंद करून 4,200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 3 प्रकरणाची नोंद करून 3,000 रूपयाची वसुलीकरण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने हनुमान नगर झोन अंतर्गत मे. गीत सुपायर यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. द राईझ यांनी जुनी इमारत पाडताना ध्वनी प्रदूषण पसरविल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे.रॉयल फॅमिली रेस्टॉरेंट यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल व उरलेले अन्न आणि पाणी वाहून जाण्याकरिता सांडपाण्याची व्यवस्था नसल्यामुळे प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे रू.10,000 चे दंड वसूल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. शारदा मिष्ठान भंडार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसूल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत मे. काझी एनक्लेव्ह यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने 6 प्रकरणांची नोंद करून रू.40,000 दंड वसुल केला.








