spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वातंत्र्य संग्राम सेनानी भैय्याजी भुते स्मृती सेवा संस्था व संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्ताने रुग्णांना व नागरीकांना नारियल पाणी व ज्युष वाटप

नागपूर :- शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी भैय्याजी भुते स्मृती सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्वातंत्र्य संग्राम सेनानी भैय्याजी भुते स्मृती सेवा संस्थाच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त शासकीय आयुर्वेद रुग्णालयातील रुग्णांना व नागरीकांना नारियल पाणी व ज्युश वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सोनेकर, विशेष अतिथी स्वातंत्र्य संग्राम सेनानी भैय्याजी भुते स्मृती संस्थाचे अध्यक्ष डॉ. निखिल भुते, कायचिकित्सा विभाग प्रमुख डॉ.जयंत गुल्हाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना शिंदे, सहाय्यक संचालक डॉ. धनंजय हंगे, विशेष उपस्थिती सामाजिक कार्यकर्ता सुनंदा भुते, विभाग प्रमुख डॉ. नीता केदार, डॉ. रूपा हंगे, डॉ.भोयर, डॉ. अकबर कुरेशी, डॉ. अनिता बोबडे, डॉ. शिवराज पाटील, अधिसेविका संगिता गजभिये, डॉ. आशिष थटेरे, प्रशासकिय अधिकारी प्रबोध धाडे आणि डॉक्टर्स, कर्मचारी, विधाथी, सामाजिक संस्था पदाधिकारी, व इतर मान्यवर पामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक डॉ. जयंत गुल्हाने, प्रास्ताविक डॉ. निखिल भुते, आभार प्रदर्शन डॉ. वंदना शिंदे यांनी केले.

Popular Articles