spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पोदार इंटरनॅशनल स्कूल, बेसा येथील देवांश आणि अथर्व चौधरी यांची अंडर-17 राज्य क्रिकेट संघात निवड

नागपूर :- जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत आयोजित अंडर-17 राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन दिनांक ४ व ५ डिसेंबर रोजी शिर्डी येथे करण्यात आले. या स्पर्धेत जोरदार प्रभावी कामगिरी करत पोदार इंटरनॅशनल स्कूल, बेसा येथील विद्यार्थी मास्टर देवांश निंबाळकर आणि अथर्व चौधरी यांची एसजीएफआय (School Games Federation of India) तर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली असून ही स्पर्धा तेलंगणा येथे पार पडणार आहे. देवांश निंबाळकर आपल्या दमदार व अचूक वेगवान गोलंदाजीसाठी, तर अथर्व चौधरी आपल्या तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळखले जातात. राज्यस्तरीय स्पर्धेत दोघांनीही उल्लेखनीय खेळ करून निवड समितीचे लक्ष वेधले. दोन्ही खेळाडूंच्या या यशाबद्दल प्रशिक्षक पंकज भडंग यांनी अभिमान व्यक्त करत सांगितले की, हे यश त्यांच्या कठोर मेहनतीचे, शिस्तीचे आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित आहे.

शाळेचे प्राचार्य एस.एन.साहू तसेच उपप्राचार्य मोहन सरकार यांनीही दोन्ही विद्यार्थ्यांचे या मोठ्या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले. शाळा परिवार, पालकवर्ग तसेच परिसरातील नागरिक या दोन्ही उभरत्या खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा देत आहेत.

Popular Articles