spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आष्टी जिल्हा बीड येथील मनोज चौधरी यांचा आरोप आष्टीचे आमदार सुरेश धस यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी

– देवेंद्र फडणवीस सरकार ला विनवणी मंत्रिमंडळातून सुरेश धस यांची हकालपट्टी करावी – मनोज चौधरी

नागपूर :- टिळक पत्रकार भवन स्थित येथे आज 11 डिसेंबर रोजी मनोज सदाशिव चौधरी राहणार करंजी तालुका आष्टी जिल्हा बीड मराठवाडा येथील असून यांनी नागपूर शहरांमध्ये नागपूर श्रामिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमदार सुरेश धस यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांना केली असून ते एक गुन्हेगार वृत्तीचे आमदार आहे. असे आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत लावले.

सुरेश धस यांची आमदारकी रद्द करून सीआयडी व एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. सुरेश धस यांनी बऱ्याच लोकांवर हल्ले केले आहे. संतोष देशमुख प्रकणावर चाललेले राजकारण आणि आरंभ या वृत्तपत्रात जाती-जातीत भांडण लावण्याच्या बातम्या सुरेश धस जाणीवपूर्वक करत आहे. सुरेश धस हे आरंभ वृत्तपत्राचे संपादक यांचे कॉल डिटेल्स चेक करावे अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.

Popular Articles