– सुरक्षासाठी एसआरपी एफ व महाराष्ट्र पोलीस चे जवान तैनात
कामठी :- 2 डिसेंबर ला पार पडलेल्या कामठी नगर परिषद निवडणुकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी 21 डीसेंबरला होणार असल्याने निवडणूक मतदान यंत्र (ईव्हीएम मशीन) रविदास नगर जवळील शासकीय आयटीआय च्या स्ट्रॉंग रूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. ठेवण्यात आलेल्या मतदान यंत्रासाठी कामठी नगर परिषद निवडणूक विभागाच्या वतीने अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून सुरक्षेसाठी एस आरपीएफ चे जवान,महाराष्ट्र पोलीस कर्मचारी हे मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले असून हे 24 तास कडक पहारा देत आहे.
तर निवडणूक विभागाच्या वतीने अभेद्य सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.सदर ईव्हीएम सुरक्षा कक्षाला 24 तास अभेद्य सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी प्रशासनाने त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.यामध्ये ईव्हीएम सुरक्षा कक्षावर सतत लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही क्यामेरे लावण्यात आले आहेत. निवडणुकीतील उमेदवार तसेच त्याचे अधिकृत प्रतिनिधी यांना सुरक्षा कक्षातील हालचाली आणि सुरक्षेचे निरीक्षण करता यावे यासाठी दर्शनी भागात एक मोठी टीव्ही स्क्रीन सुद्धा लावण्यात आली आहे. तसेच नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांची तीन शिफ्ट मध्ये 24 तास ड्युटी लावण्यात आली आहे.यात 20 अधिकारी व 20 कर्मचार्यांचा समावेश आहे.तसेच निवडणुक निर्णय अधिकारी व सहाययक निवडणुक निर्णय अधिकारी दररोज आळी पाळीने भेट देत आहेत तसेच 24 तास पोलिसाचा कडक पहारा आहे.प्रशासनाने मतदानाची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत.21 डीसेंबर पर्यंत 24 तास ईव्हीएम मशीनची सुरक्षा ही कडक रित्या केली जाणार आहे.निवडणूक मतदान मोजणी ही लांबणीवर पडल्याने प्रशासनावर ईव्हीएम मशीन सुरक्षेची मोठी जवाबदारी पडली असल्याने सुरक्षेसाठी प्रशासनाचा ताण वाढला आहे.




