कामठी :- न्यायालयीन प्रक्रियेमुळे 2 डिसेंबर ला झालेल्या कामठी नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्र 10(अ),प्रभाग क्र 11(ब) व प्रभाग क्र 17 (ब) या तीन प्रभागातील निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती .निवडणुक आयोगाने दिलेल्या निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रमानुसार उपरोक्त नमूद तीन प्रभागातील निवडणूक आगामी 20 डिसेंबर ला होणार आहे.या तीन प्रभागातील उमेदवार नगरसेवक म्हणून निवडण्यासाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 21डिसेंबर ला मतमोजणीतून निकाल लागणार आहे.
त्यात निवडणूक आयोगाने दिलेल्या नवीन कार्यक्रमा नुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 10 डिसेंबर ही शेवटची तारीख होती .त्यातील तीन ही प्रभागातील एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतले नाही ज्यामुळे प्रभाग क्र 10 (अ) मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील चार उमेदवार कायम आहेत ज्यामध्ये समाजवादी पार्टी कडून कांबळे दिक्षा प्रभाकर,कांग्रेस मधून फातेमा कौसर जमिल अहमद,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मधून रंगारी सिद्धार्थ सुखदेव,भारतीय जनता पार्टी कडून शेंडे मौसम रघुनाथ चा समावेश आहे.तसेच प्रभाग क्र 11 ब मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून 6 उमेदवार कायम आहेत ज्यामध्ये बहुजन रिपब्लिकन एकता मंच कडून अब्दुल इशरत फातमा अब्दुल वसीम,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून आतिफ अख्तर खालिद अख्तर,शिवसेना कडून शुभम दिलीपराव तडसे, कांग्रेस कडून प्रधान काशिनाथ गुलाबराव,भाजप कडून भोगे आकाश रघूनाथ,समाजवादी पार्टी कडून फरदिन मलिक एजाजुल मलिक चा समावेश आहे.तर प्रभाग क्र 17 ब मध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गतुन चार उमेदवार कायम आहेत ज्यामध्ये शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मधून काटगाये सुनील बिसन, भाजप कडून पडोळे प्रतीक चंदू ,अपक्ष मधून भोकरे आकाश प्रदीप,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून मजहरूल हसन हैदरी वल्द मुस्तफा हसन चा समावेश आहे. आज 11डिसेंबर ला चिन्हाचे वाटप करण्यात आले असून 12 डीसेंबर पासून प्रचाराला सुरुवात होणार आहे.हा प्रचार 18 डिसेंबर पर्यंत करता येणार आहे त्यामुळे मधल्या काळात प्रचाराची थंडावलेली गती पुन्हा वाढणार असून ऐन थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या प्रचारात उमेदवारांना सात दिवसाचा अवधी मिळाला आहे.यावेळेस प्रचार खर्चत वाढ होण्याची शक्यता आहे असे असताना निवडणूक आयोगाकडून खर्च बाबत अद्यप पर्यत मार्गदर्शन मिळाले नसल्याचे समजते.








