spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात जि.प. उच्च प्राथमिक शाळा पांजरा केंद्रात प्रथम

– गावाने केले बाल-गोपालाच्या विजयी रॅलीचे आयोजन शिक्षकवृंदांचेही केले सत्कार

तिरोडा :- अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेकडून सुरु असुन जि. प. प्राथमिक व उच्चप्राथमिक शाळेत जिल्ह्यातील अनेक केंद्रात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात कबड्डी, खो-खो, रनिंग, बुद्धिबळ, सामान्य ज्ञान स्पर्धा, सांस्कृतिक, एकल व सामूहिक नृत्य, नाटक, व इतर कार्यक्रम प्रत्येक केंद्रात सुरु आहेत.

तिरोडा तालुक्यात घाटकुरोडा या गावी मुंडीकोटा केंद्रातील सर्व शाळा अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झाल्या असुन या केंद्रातून स्मार्ट ग्रामपंचायत पांजरा च्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने प्राथमिक गटातून खो-खो खेळाच्या स्पर्धेत, एकल नृत्यात प्रथम तर समूह नृत्य, सामान्य ज्ञान स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवीला तसेच उच्च प्राथमिक गटात समूह नृत्य, एकल नृत्य प्रथम तर प्रश्नमंजुषा मध्ये द्वितीय क्रमांक पटकवीला आहे.

स्मार्ट गाव पांजराचे नाव जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी केंद्रात प्रथम द्वितीय क्रमांक पटकावून लौकिक केल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग, समस्त गावकऱ्यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत समारंभ व गावातून विजय रॅली काढून ग्रामपंचायत येथे शिक्षकवृंदांचे मोलाचे सहभाग असल्याने जि. प. शाळेचे मुख्याद्यापक तुळशीराम शहारे, धम्मदिप वासनिक, सुचिता बोन्द्रे व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गावचे सरपंच शारदा राजेंद्र चामट, उपसरपंच सुभाष चव्हाण, ग्रामविकास अधिकारी दत्ता हडबे, निरंजना उपासे, शालिनी गोमासे, सुषमा उकेबोन्दरे, महेश गाढवे, सर्व ग्रा. प सदस्य, माजी. सरपंच राजेंद्र चामट, शाळा व्य. समिती अध्यक्ष प्रणोती महेंद्र नंदागवळी, शा. व्य. स. उपाध्यक्ष हिराकुमार गोमासे, सुनंदा मारबते, गिता मडावी, नितीन आस्वले, प्रीती चामट, रीना चामट शा. व्य. स. सदस्य, कमला गाढवे, मंजुषा आश्वले मदतनीस, तंटामुक्त समिती अध्यक्ष रेवानंदजी वाकुळकर, अपूर्वा भोंगाडे, अनिल चव्हाण ग्रा. प. कर्मचारी, पोलीस पाटील भारती रामटेके, अंगणवाडी सेविका उर्मिला मरस्कोल्हे, समस्त गावकरी नागरिक, तरुण-वर्ग बालगोपाल, महिला भगिनी उपस्थित होते.

Popular Articles