spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पीएम श्री जि प शाळा दहेगाव येथे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

किशोर साहू, मौदा, ता. १४ :- पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ग्रामपंचायत दहेगाव सरपंचा भारती आंबिलढुके ,कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितेश इंगळे ,प्रमुख पाहुणे म्हणून प स मौदा गटशिक्षणाधिकारी संकेत मरसकोल्हे , केंद्र प्रमुख धानला राजू आंबिलकर, उपसरपंच रवींद्र ढोमणे , शा.व्य. समिती उपाध्यक्ष रणधीर आंबिलढूके, माजी सरपंच रमेश आंबिलढुके, संदिप आंबिलढुके, संजय मेहर, यशवंत आंबिलढुके ,गट ग्रामपंचायत दहेगाव चे सर्व पदाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्यगण या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजू आंबिलकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगितले. मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी उपस्थित धानला केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व अध्यापकांचे स्वागत केले. केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये धानला केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग घेतला. या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये लंगडी ,खो-खो ,कबड्डी वरिष्ठ नृत्य व कनिष्ठ नृत्य, कुस्ती रीले ,संगीत , सांघिक, वैयक्तिक खेळ घेण्यात आले .खोखो कनिष्ठ आणि वरिष्ठ मुले मुली , तसेच वरिष्ठ नृत्य ,वरीष्ठ लंगडी मुली, वरिष्ठ कबड्डी मुली,समुहगित स्पर्धेत, पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव यांचा प्रथम क्रमांक आला.रिले मुले , कुस्ती या स्पर्धेत प्रतिक मेहर ,स्वरांकीत मेहर,वंश आंबिलढुके यांचा प्रथम क्रमांक आला.बुध्दीबळ स्पर्धेत सृष्टी अहिरकर प्रथम क्रमांक मिळाला.100 मिटर दौंड स्पर्धेत शौर्य मलेवार, माही आंबिलढुके ,200मिटर दौंड स्पर्धेत मानवी हटवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेनिमित्त धानला केंद्रातील सर्व मुख्याध्यापक ,सर्व सहाय्यक शिक्षक यांनी क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले . पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथील शिक्षकवृंद लीलाधर काळबांडे , राजेश रोहाड, सुधीर खंडाईत , सुधीर कांबळे ,सुजाता बोदेले , प्रज्ञा रामटेके , संगीता आंबिलढुके ,उमेश उके पुष्पलता उके ,कैलास फटिंग यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार राजेश रोहाड यांनी केले.सर्व विजेताचमुचे अभिनंदन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

Popular Articles