नागपुर :- दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू बाळगुन विकी करणाऱ्यांवर छापा टाकुन देशी दारू, मोहाफुल दारू असा एकुण २८२०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस स्टेशन उमरेड येथे एकुण १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन मौदा येथे एकुण १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन रामटेक येथे एकुण ०१ गुन्हा नोंद आहे. महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अन्वये एकुण ३ गुन्हे नोंद केले आहे. सदर कारवाईत ३०६० मिली देशी दारु, १२ लीटर मोहाफुल दारू असा एकुण २८२०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशवंत मुद्देमाल पंचनामा कारवाई करून नष्ट करण्यात आला आहे.








