spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मेयो कामगार मनोहर झांमरे दोन वर्षापासून पेन्शनपासून वंचित

– सफाई कामगाराच्या वारसामध्ये माझ्या ठिकाणी नाथिनला नोकरी द्या! पत्रपरिषदेत मागणी :

नागपूर :- पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना सांगू इच्छितो की, मी मनोहर झामरे गरिब व होतकरू कामगार असून गेल्या पंचवीस वर्ष मेयो हॉस्पिटल येथे परमंन्ट कामगार म्हणून होतो. मी ऑगष्ट 2024 मध्ये सेवानिवृत्त झालो. मी सफाई कामगार मधून काम करत होतो. परंतु दोन वर्षांपूर्वीपासून मला पेन्शनपासून वंचित ठेवल्या गेले आहे. करिता मला पेन्शन मिळावे. पत्रकार परिषदेत न्याय मिळण्या साठी धाव घेतली आहे. तसेच पिडीत मेयो सफाई कामगारांच्या परिवारातील माझ्या ठिकाणी, माझ्या वारसामध्ये, नाथीन ला नोकरी द्यावी. आजपर्यंत मेयो हॉस्पिटलने वारसात नोकरी दिली नाही. या प्रकरणा संदर्भात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सुद्धा मी माहिती देवून निवेदन दिले होते. परंतु आजपर्यंत माझं कोणतेही काम झालेलं नाही. मेयो हॉस्पिटल ने मला थांबवलेली दोन वर्षाची पेन्शन देण्यात यावी व माझ्या परिवारातील सुशिक्षित नाथीन ला नौकरी देण्यात यावी. अशी मनोहर झामरे यांनी पत्र परिषदेत मागणी केली आहे.

Popular Articles