spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लाखाचा गॉगल चोरीला! तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले

नागपूर :- हौसेला मोल नसते अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. लाखो रुपये खर्च झाले तरी हौशेची माती करायची नाही, अशा अविर्भावात वावरणारेही आपण अवती भवती पहात असतो. मात्र कधी कधी त्या हौसेची किंमत मोजावी लागते हे देखी बुधवारी उपराजधानीत अक्षरशः खरे ठरले. तब्बल एक लाख रुपये किमतीचा गॉगल चोरीला गेल्याची तक्रार घेऊन एक तरुण कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि क्षणभर पोलिसांनाही विश्वास बसला नाही.

तक्रार ऐकून “वेड्यात काढतोयस का?” असे दरडावत पोलिसांनी त्याला विचारले. मात्र तक्रारदाराने खिशातून गॉगल खरेदीचे अधिकृत बिल काढून पोलिसांसमोर ठेवले आणि वातावरणच बदलले. पावती पाहून पोलिसही अवाक झाले. खात्रीसाठी इंटरनेटवर गॉगलची किंमत तपासल्यानंतर अखेर पोलिसांचा नाईलाज झाला आणि लाखाच्या गॉगल चोरीचा गुन्हा नोंदवावा लागला. करण राजेंद्र जयस्वाल (३०) रा. राणी कोठी, महाल असे महागडा गॉगल खरेदी करणाऱ्या हौशी तरुणाचे नाव आहे. व्यावसायिक असलेल्या करण यांनी धरमपेठेतल्या एका नामांकित चष्म्याच्या दुकानातून हा फिलिप्स कंपनीचा महागडा गॉगल खरेदी केला होता. करण यांना आपल्या कारवर एका चालकाची गरज होती. याची माहिती मिळाल्याने स्वराज संजय मेश्राम (२७) हा त्यांच्याकडे गेला.

दरम्यान गाडी चालवून दाखवताना स्वराजची गाडीत ठेवलेला गॉगलवर नजर पडली. गॉगलचा मोह अनावर झाल्याने त्याने तो चोरला. मात्र गॉगल चोरल्यानंतर तो परत आलाच नाही. दरम्यान करण यांना गॉगल सापडत नसल्याने त्यांनी थेट कोतवाली पोलीसठाणे गाठत स्वराज विरोधात तक्रार केली. करण यांनी त्याचा भ्रमणदूरध्वनी क्रमांकही पोलीसांना दिला.

गुन्हा नोंद होताच पोलिसांनी ‘लाखाचा गॉगल’ नेमका कुणाच्या डोळ्यावर चढला, याचा शोध सुरू केला. अखेर राम कुलर चौकात चोर स्वराज पोलिसांच्या हाती लागला. त्याने गॉगल चोरीची कबूली देत तो पोलिसांकडे सुपूर्द केला. मात्र या प्रकरणाने बुधवारी कोतवाली पोलीसांत दिवसभर करमणूकीची खदखद होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.