– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे.शुक्रवार(ता.19) शोध पथकाने 90 प्रकरणांची नोंद करून 54,400 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 26 प्रकरणांची नोंद करून 10,400 रुपयांची वसुली करण्यात आली.व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची 200 रूपयाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 9 प्रकरणाची नोंद करून 3,600 रूपयांची वसुली करण्यात आली.दवाखाने,इस्पितळे,पॅथलॅब इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली.

मॉल,उपहारगृहे,लॉजिंग च बोर्डिंगचे हॉटेल सिनेमा हॉल मंगलकार्यालये,कॅटरर्स सर्विस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 30 प्रकरणांची नोंद करून 23,000 रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विके्रता यांनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 6 प्रकरणाची नोंद करून 6,000 रूपयाची वसुली करण्यात आली.सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणेबांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे /साठवणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 12 प्रकरणांची नोंद करून 2,200 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. आर. के. कंस्ट्रक्शन यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंउ वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. अंगद पतंग यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसूल करण्यात आले. तसेच मयुर पेठे यांनी कचरा शुल्क न भरल्यामुळे व कचरा अन्य ठिकाणी फेकल्यामुळे रू.5,000 दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. प्रसादम् रेस्टॉरेंट यांनी अनधिकृत भूखंडावर रेस्टॉरेंटचा कचरा टाकल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. तसेच दत्ता भास्करराव यांनी रस्त्यालगत सी अँड डी कचरा टाकल्यामुळे रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. गाई दुर्गा किराणा स्टोअर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. महाजन किराणा स्टोअर यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसूल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 7 प्रकरणांची नोंद करून रू.40,000 दंड वसुल केला.




