spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कांद्री नगरपंचायत नगराध्यक्ष पदी भाजप-शिव सेना महायुतीचे सुजित पानतावणे विजयी

– नगरसेवक – भाजप – ९, शिवसेना (शिंदे) – ५, कॉग्रेस – २ तर शिवलेना (उबाठा) – १ 

कन्हान :- कांद्री नगरपंचायतीची पहिलीच सार्वत्रिक निवडणुकित भाजप–शिवसेना महायुतीने दणदणीत विजय मिळवित वर्चस्व सिद्ध केले. यात थेट नगराध्य क्ष पदाकरिता भाजप-शिवसेना (शिंदे) महायुतीचे सुजित पानतावणे हे विजयी झाले असुन नगरसेवक एकुण १७ प्रभागांपैकी भाजपाने ९ तर शिवसेना (शिंदे ) ने ५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. काँग्रेस ला २, शिवसेना उबाठा गटाला १ जागेवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे संपुर्ण परिसरात भाज प-शिवसेनेच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

कांद्री नगरपंचायतीत एकुण ९,६२३ मतदार असुन त्यापैकी ६,८६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते. निकाल ३ नोव्हेंबरला होणार होते, मात्र सर्वोच्च न्याया लयाच्या आदेशानंतर २१ डिसेंबर २०२५ रोजी निका ल जाहीर असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. थेट नगराध्यक्षपदाकरिता भाजपाचे उमेदवार सुजित पानतावणे यांना ३,५२७ मते मिळाली, तर महेश झोडावणे यांना २,३९१ मते मिळाल्याने सुजित पानतावणे यांनी काँग्रेसचे उमेदवार महेश झोडावणे यांचा १,१३६ मतांनी पराभव करित दणदणीत विजय मिळवला.

प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे

प्रभाग क्र. १ – मीनाक्षी भुते (शिवसेना शिंदे) – ८९, प्रभाग क्र. २ – सविता दिनेश राऊत (भाजप) – १८०, प्रभाग क्र. ३ – चंद्रपाल राजकुमार कश्यप (शिवसेना शिंदे) – १८२, प्रभाग क्र. ४ – नीतु राजेंद्र परते (काँग्रेस) – २१७ , प्रभाग क्र.५ – निकेश महादेव मेश्राम (काँग्रेस) – १७२ ,प्रभाग क्र.६ – शुभांगी पवन कुंभलकर (उबाठा )- १५८ , प्रभाग क्र. ७ – माधुरी मोरेश्वर मस्के (भाजप) – १७४ , प्रभाग क्र. ८ – शिवशंकर रामभाऊ चकोले (भाजप) – ११५, प्रभाग क्र. ९ – उमेश वाडीभस्मे (शिवसेना शिंदे) – १९५, प्रभाग क्र. १० – धर्मेंद्र उर्फ बंटी सुभाष सरोदे (शिवसेना शिंदे) – २९९, प्रभाग क्र. ११ – सिताराम बापुराव नाटकर (भाजप) – १६६, प्रभाग क्र.१२ – आरती रविद्र कोटपल्लीवार (भाजप)- २३९, प्रभाग क्र. १३ – रिता भगवान मस्के (भाजप) – २४८, प्रभाग क्र. १४ – अतुल रमेश हजारे (भाजप) – १४१, प्रभाग क्र. १५ – संघमित्रा विकास डोंगरे (भाजप) – १२८, प्रभाग क्र.१६ – रोशनी अतुल गजभिये (भाजप) – १९२, प्रभाग क्र. १७ – राकेश कमलाकर लांजेवार (शिवसेना शिंदे) – २६१ असे

कांद्री नगरपंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत भाजप -शिवसेनेचा स्पष्ट विजय झाल्याने महायुतीच्या कार्य कर्त्यां मध्ये उत्साह संचारला. खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न या निवडणुकीत होता तरी मित्र पक्षाची आघाडी न केल्याने निकालात त्यांच्या गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजप प्रदेशाध्य क्ष चंद्रशेखर बावनकुळे व आमदार आशिष जयस्वाल यांनी महायुती केल्याने चांगले यश संपादन करू शकले असे या निकालातुन स्पष्ट झाले.

मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली असुन निवडणुक निर्णय अधिकारी पूनम कदम, सहाय्यक निवडणुक अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण निवडणुक प्रक्रिया यश स्विपणे राबविण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबा धित ठेवण्यासाठी विभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड व ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांच्या नेतृ त्वात कन्हान पोलिसांसह बाहेरील पोलीस दलाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कांद्री शहर पोलिस छावणीचे स्वरूप धारण केले होते. निकाल जाहीर होताच भाजप–शिवसेनेचे झेंडे फडकावले गेले, गुलाल उधळण्यात आला व विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पराभुत उमेदवारां च्या चेहऱ्यावर निराशा दिसत असली तरी एकुणच निवडणुक शांततेत पार पडल्याने नागरिकांनी समाधा न व्यक्त केले.

विजयानंतर बोलताना नगराध्यक्ष भाजप-शिव सेना युतीचे सुजित पानतावणे यांनी नागरिकांचे आभा र मानत, “आता केवळ विकास हाच अजेंडा असुन कांद्री नगरपंचायतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहु,” असे सांगितले.

Popular Articles