spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चिमूकल्याकडून सुप्त कलागुणांची उधळण, नागलवाडी येथे क्रिडा स्पर्धेचे आयोजन

खापा :- नागलवाडी येथे केंद्र क्रिडा स्पर्धेचे आयोजन (दि. १९) ला करण्यात आले होते. यात चिमूल्यांनी सुप्त कलागुणांची उधळण करित उपस्थितांची मने जिंकली.

सिरोंजी केंद्रातील, सिंदेवाणी, टेकाडी कोरमेटा, बिचवा, सर्रा, नागलवाडी, सुरेवाणी, महारकुंड, सोनपूर, सिरोंजी इत्यादी शाळेतील दोनशे पेक्षा अधिक खेळाडूनी सहभाग घेतला. वर्ग १ ते ५ वर्गाचा कनिष्ट गट व वर्ग ६ ते ८ चा वरिष्ठ गट मध्ये सांघिक, वैयक्तीक व व सांस्कृतिक खेळाचा सहभाग होता. यात अनेक खेळाचा प्रकारात चुरशीची खेळ बघाय‌ला मिळाला. विजेत्या संघाला शिल्ड, चषक व मेडल देऊन गौरवण्यात आले. विजेत्या संघाची निवड तालूका स्तरीय क्रिडा स्पर्धेकरिता करण्यात आली.

स्पर्धेचे उद्‌घाटक म्हणून सरपंच दिपाली ठाकरे या होत्या. तर अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर टेकाम (शाळा व्यवस्थापन समिती) हे लाभले. प्रमूख अतिथी म्ह‌णून गटशिक्षणाधिकारी कश्यप सावरकर, प्रविण लेले, वन परीक्षेत्र अधिकारी नागलवाडी, क्षेत्र सहाय्यक सुनिल भोयर आदि उपस्थित उपस्थित होते. मान्यवरांनी खेळाडूना भावि जीवनात उत्तम खेळाडू म्हणून नाव लौकिक करावे. अशी अभिलाषा व्यक्त केली.

स्वधेचे प्रास्तावीक केंद्रप्रमुख लिलाधर सोनवाने यांनी केले. सूत्रसंचालन, योगेश भुरसे व मंगेश कळसाईत यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जयश्री ठाकरे, इंदिरा सिरसाम, अर्पणा शेरकर, सुधीर तऱ्हाने, महेश शिंदे, विशाल दराडे, म्हात्रे, दिनेश घोळसे, निलेश सपाटे, विक्की वर्मा, अक्षय डोंगरे, नगराळे, योगेश ठाकरे आदींनी मोलाचे परिश्रम घेत‌ले. आभार मुख्याध्यापक प्रभु कारोकार यांनी मानले. स्पर्धाची सांगता वन्दे मातरमनी झाली.

Popular Articles