– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. रविवार व सोमवार(ता.21व22) शोध पथकाने 90 प्रकरणांची नोंद करून 43,200 रुपयाचा दंड वसूल केला.
सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 200 रूपयाची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400 दंड) या अंतर्गत 31 प्रकरणांची नोंद करून 12,400 रुपयांची वसुली करण्यात आली.व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची 200 रूपयाची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400 दंड) या अंतर्गत 5 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयांची वसुली करण्यात आली. मॉल,उपहारगृहे,लॉजिंग च बोर्डिंगचे हॉटेल सिनेमा हॉल मंगलकार्यालये,कॅटरर्स सर्विस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 12,000 रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी वाहने/ जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. वैद्यकीय व्यवसायीकानी बायोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कचऱ्यात टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली.

वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 7 प्रकरणाची नोंद करून 7,000 रूपयाची वसुली करण्यात आली.उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 27 प्रकरणांची नोंद करून 5,400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. साफल्य इंफ्रास्ट्रक्चर यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले.तसेच मे. डिझाईन इनसाईड अपार्टमेंट व राजेश भुरे यांनी रस्त्यालगत सी अँड डी वेस्ट टाकल्यामुळे प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे एकूण रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. लाईफ स्टाईल यांनी रस्त्यालगत दुकानाचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. पार्क व्हियु यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. नेहरूनगर झोन अंतर्गत मे. रजत स्वीटस् व मे. अमृत डेअरी यांनी रस्त्यालगत दुकानाचा कचरा टाकल्यामुळे व शुल्क न भरल्यामुळे प्रत्येकी रू. 5,000 या प्रमाणे एकूण रू. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. साईबाबा किराणा स्टोअर्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू.5,000 दंड वसूल करण्यात आले.सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. साई आर्शिवाद स्वीटस् यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसूल करण्यात आले. तसेच मे.राज इंफ्रास्ट्रक्चर्स यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000 चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 10 प्रकरणांची नोंद करून रू.70,000 दंड वसुल केला.




