spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रामटेक – बाजार चौक चाचेर – मौदा या बंद झालेल्या बस फेऱ्या पुन्हा सुरू करा – भाजपा किसान आघाडी मंत्री विनोद कोपरकर 

किशोर साहू, मौदा ,ता.२३ :- रामटेक -बाजार चौक चाचेर -मौदा या रामटेक आगाराच्या बस फेऱ्या बंद झालेल्या असून विद्यार्थिनी, महिला व सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या बस फेऱ्या पुन्हा सुरू कराव्या यासाठी चाचेर येथील भाजपचे किसान आघाडीचे मंत्री विनोद कोपरकर यांनी याबाबत अनेकदा रामटेक आगार प्रमुखांना लेखी निवेदने दिले.

मात्र त्यांनी अजूनही दखल न घेतल्याने कोपरकर यांनी आता त्या बस फेऱ्यांचे निवेदन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, परिवहन राज्यमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठवले आहे. त्या बस फेऱ्या लवकरात लवकर सुरू कराव्या अशी मागणी त्यांनी केली आहे.

त्या निवेदनाची प्रत त्यांनी रामटेक आगाराचे आगार प्रमुख भगत व मेश्राम यांना दिले. याप्रसंगी माजी सरपंच महेश कलारे, सामाजिक कार्यकर्ते गुणवंत कडू उपस्थित होते.

Popular Articles