नागपूर :- महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद, मुंबई द्वारा जागतिक फार्मासिस्ट दिन पारितोषिकचा पुरस्कार फार्मसिस्ट निखिल भुते यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद द्वारा आयोजित जागतिक फार्मासिस्ट दिन पारितोषिक वितरण समारंभचा वैयक्तिक स्पर्धा विजेता फार्मसिस्ट निखिल भुते यांना देण्यात आला, याबद्दल विविध क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात येत आहे. ‘ऑडिटोरियम हॉल’ तायवाडे फार्मसी कॉलेज कोराडी येथे आयोजित करण्यात आला होता, यावर्षी फार्मसी क्षेत्रात अविस्मरणीय कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती व महाविद्यालय महाराष्ट्र राज्य औषध निर्माण परिषद तर्फे विविध पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष मुकुंद दुबे, कार्यक्रमाचे उद्घाटक तायवाडे फार्मसी कॉलेजचे संस्थापक डॉ. बबनराव तायवाडे, विशेष अतिथि महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदचे उपाध्यक्ष धनंजय जोशी, कार्यकारिणी सदस्य सोनाली पडोळे, तायवाडे कॉलेजचे प्राचार्या डॉ. शरयु तायवाडे, तायवाडे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.गीता लोधी, प्राचार्य विक्रांत चिलाटे आणि विदर्भातील फार्मसी क्षेत्रातील अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार होते.
विदर्भ फार्मासिस्ट असोसिएशनचे मुख्य संयोजक फार्मेसिस्ट निखिल भुते विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून जागतिक फार्मासिस्ट दिन आणि वर्षभर फार्मसी कार्यक्षेत्रात अनेक उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात, यामध्ये रोगनिदान शिबिर, रक्तदान शिबिर, जनजागृती कार्यक्रम, वृक्षारोपण, रॅली, कॉन्फरन्स अश्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात तसेच सामाजिक कार्यक्षेत्रात नेहमीच तत्पर राहुन सर्वांनाच मदत करत असतात.
कार्यक्रमाचे संचालन मनीषा वालदे, प्रास्ताविक अरविंद अग्रवाल यांनी केले तर आभार विक्रांत चिलाटे यांनी मानले.




