नागपूर :- सी आय टी यू संलग्न व्हि. एन आय टी मधील कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध मागण्या करता नागपूरच्या संविधान चौकात धरणे आंदोलन व निदर्शने केली. आंदोलनाचे नेतृत्व कॉ. अमृत मेश्राम, कॉ. राजेंद्र साठे, काँ. प्रमोद कावळे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. ८ ते १५ वर्षापासून व्हि.एन.आय.टी. येथे कंत्राटी तत्वावर हाउस कीपिंग, गार्डन कर्मी व सिक्युरिटी गार्ड कर्मचारी कार्यरत असून त्यांना किमान वेतन मिळावे, दर सहा महिन्याने महागाई भत्ता विशेष भत्ता मिळावा, सेवानिवृत्तीची वय ५५ वरून ६० वर्ष करावी, कंत्राटदार बदलल्यानंतर सुद्धा कर्मचारी बदलू नये, सर्व करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये सामावून घ्यावे, सेवानिवृत्तीनंतर ग्रॅज्युटी व पेन्शन लागू करावे, तीन वर्षापासून थकीत दिवाळी बोनस द्यावे. अशा विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले. व्हि एन आय टी प्रशासन कामगारांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागपूरच्या जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले असून संबंधित डायरेक्टर सोबत मीटिंग घडवावी अशी विनंती केली. शिष्टमंडळात कॉ. अमृत मेश्राम, कॉ. राजेंद्र साठे, प्रियंका मडामे, प्रमिला सनेश्वर, शशिकला बाराहाते उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रामुख्याने संदीप कुंभरे, योगेश गोराडे,रमेश कुकडकर, मंदा भामकर सह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.








