– २० किलो डोडा पावडर जप्त नागपूर ग्रामीण पोलीसांची कामगिरी
मौदा :- अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथक पेट्रोलींग करीत असतांना असतांना गुप्त बातमीदाराने खात्रीशीर माहीती दिली की, मालवा पंजाब धाबा येथे असलम प्यारा खान, वय २१ वर्ष, रा. बरहमपुर लुधियाना, ह. मु. मालवा पंजाब धाबा, वडोदा, ता. कामठी, जि. नागपुर हा आपल्या धाब्यामध्ये डोडा पावडर या अंमली पदार्थाची विक्री करीत आहे. नमुद पथकाने सदर माहीती मौदा पोलीसांना देत मौदा पोलीसांसह सयुंक्तीक कारवाई करत मिळालेल्या माहीतीच्या आधारे घटनास्थळी जावुन सापळा रचुन आरोपी नामे असलम प्यारा खान, वय २१ वर्ष, रा. बरहमपुर लुधियाना, ह. मु. मालवा पंजाब धाबा, वडोदा, ता. कामठी याला ताब्यात घेतले. आरोपीच्या धाव्याची कायदेशीररित्या पंचासमक्ष झडती घेतली असता डोडा पावडर अंमली पदार्थ मिळून आला. पोलीसांनी नमुद आरोपीच्या ताब्यातुन १) अंमली पदार्थ डोडा पावडर वजन २०.४४० कि. ग्रॅ. किंमती ३,०६,६००/- रुपये २) बजाज कंपनीची व्हि १२ विकांत मोटरसायकल क्र. एम एच-४०/बी डी-०९२९ किंमती ५०,०००/- रुपये आणि ३) एक अॅड्रॉईड मोबाईल किंमती १५,०००/- रुपये असा एकुण ३,७१,६००/- रूपयांचा मुद्देमाल आरोपीकडुन जप्त करण्यात आला आहे.
नमुद प्रकरणी आरोपी नामे असलम प्यारा खान, वय २१ वर्ष, रा. बरहमपुर लुधियाना, ह. मु. मालवा पंजाब वडोदा, ता. कामठी याच्याविरूद्ध पोलीस स्टेशन मौदा येथे एन. डी. पी. एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.








