नागपूर :- नागपुरातील आसमान फाउंडेशनच्या वतीने वर्धा येथे दिवसेंदिवस वाढत्या थंडीमुळे वर्धा येथील आसमान फाउंडेशन तर्फे वर्धास्थित निरंतर गोर गरीबांना ब्लैंकेट व निराधार मुलांना स्वेटर वाटप करीत आहे. यानुसार वर्धा येथील दत्तपुर में कुष्ठरोग रुग्णालय व पुनर्वसन केंद्रांतील कुष्ठरोगींना व आसमंत स्नेहालयातील निराधार वरिष्ठ नागरिक व मुलांना ब्लैंकेट वितरीत केले गेले. तसेच श्रीछाया बालगृहातील मूक-बधीर मुलांना कोल्ड क्रीम, मिठाईचे वाटप केले गेले. याप्रसंगी अध्यक्ष डॉ.रवि गिऱ्हे आसमान फाउंडेशन, सचिव नरेश शेंडे, अखई पटेल, वर्धा शाखा प्रभारी श्याम चंद्रा, आसमान महिला क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा मेघा गिऱ्हे, दिनेश टेकाडे, निलेशजी व वर्धा स्थित सदस्य उपस्थित होते. वर्धा फाउंडेशनच्या शाखेतर्फे निरंतर जिल्ह्यातील गरीब, निराधार मुलांना, महिलांना व वरिष्ठ नागरिकांना जनसहयोगतून सहयोग केला जातो. असे डॉ. रवि गिऱ्हे यांनी सांगितले.








