spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अमरावती – नागपुर राष्ट्रीय महामार्ग कं ६ चौदामैल येथे घेतलेल्या बैठकीबाबत..

 

नागपुर १५ : नागपुर दिनांक ०५/०७/२०२५ रोजी दुपारी १३:०० वा दरम्यान अमरावती राष्ट्रीय महामार्ग कं ६, चौदामैल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा (तत्कालीन उपविभागिय पोलीस अधिकारी सावनेर विभाग), पोलीस निरीक्षक  मनोज काळबांडे, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन कळमेश्वर, पोलीस निरीक्षक  वैभव जाधव, प्रभारी अधिकारी जिल्हा वाहतुक शाखा, नागपुर ग्रामीण जिल्हा, पोलीस स्टेशन कळमेश्वर चे अधिकारी आणि अंमलदार, महामार्ग सुरक्षा विशेष पथक नागपुर चे अधिकारी आणि अंमलदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे संबधित अधिकारी, संबधीत ठेकेदार, चौदामैल येथील सरपंच आणि नागरिक असे हजर होते.
सदर बैठकीमध्ये सर्विस रोडवर पडलेल्या खड्डयांमुळे ट्रैफिक जाम व सुरू असलेल्या ओव्हरब्रिज चे बांधकामामुळे स्थानिक लोकांना होणाऱ्या त्रासांबाबत चर्चा करण्यात आली. सदर बैठकी मध्ये  अनिल म्हस्के यांनी संबधीत कंपनी ठेकेदार यांना रोडवरील खड्‌डे बुजवुन स्ट्रिट लाईट व सुचना फलक लावण्याबाबत सुचना दिल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे संबधीत अधिकारी यांना लक्ष देण्याबाबत सुचना दिल्या होत्या. सदर सुचनेप्रमाणे संबधीत कंपनी ठेकेदार यांनी सर्विस रोडवरील खड्‌डे बुजविले असुन लवकरच सिमेंट रोड बनविण्याचे तयारीत आहे. तसेच सदर रोडवर एखादे वाहन बिघाड होवुन अचानक बंद झाल्यास त्याला काढण्याकरीता करणेकरीता हायड्रा ची व्यवस्था तसेच रूग्णवाहीकेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संबधीत कंपनी ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे संबधीत अधिकारी यांना पोलीस स्टेशन कळमेश्वर येथुन नमुद बाबतीत पत्र व्यवहार करण्यात आला आहे. तसेच
त्यांना रहदारीच्या अनुषंगाने योग्य सुचना देण्यात आल्या आहे. महामार्ग सुरक्षा विशेष पथक चे पोलीस निरीक्षक यांना सुध्दा योग्य लक्ष देण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहे.

Popular Articles