कन्हान :- नाभिक एकता मंच खंडाळा (घटाटे) व्दारे खंडाळा गावातील चौकाला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक शिवरत्न जिवाजी महाले यांच्या नावाचे फलक अनावरण सोहळा थाटात संपन्न झाला.
सोमवार (दि.३०) डिसेंबर २०२५ ला ग्राम पंचायत खंडाळा (घटाटे) येथील गावातील चौकाला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक शिवरत्न जिवाजी महाले यांच्या नावाचे फलकाचे अनावरण सरपंच विमल बोरकुटे यांच्या शुभहस्ते व ग्रा. पं. सदस्य, तथा माजी सरपंच रविंद्र केने यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन उपसरपंच चेतन कुंभारकर, ग्रा.प. सदस्या वर्षा नागपुरे, मनिषा हटवार, नाभिक एकता मंच अध्यक्ष धनराज वालुकार, केंद्रीय दुकानदार संघ अध्यक्ष नरेश लक्षणे, विदर्भ अध्यक्ष शरद वाटकर, जिल्हा अध्यक्ष विलास वाटकर, नागपुर ग्रामिण जिल्हा सचिव राहुल गणोरकर, पारशिवनी तालुका अध्यक्ष सुनिल लक्षणे, सुनिल लाडेकर, किशोर गाडगे, प्रमोद केजरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांनी शिवाजी महाराजांचे जीव वाचवणाऱ्या शूरविर आणि इमानदार अंग रक्षक म्हणुन न्हावी समाजातील शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जीवनावर प्रकाश टाकित ‘ होता जीवा म्हणुन वाचला शिवा.’ या म्हणी विषयी सुध्दा सविस्तर मार्गदर्शन केले. खंडाळा गावातील चौरस्त्याला शिवरत्न जिवाजी महाले नाव दिल्याबद्दल ग्राम पंचायत खंडाळा (घ) सरपंच, उपसरपंच, सदस्य व सचिव आणि पोलीस पाटील यांचे नाभिक एकता मंच व्दारे आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी प्रदीप वानखेडे, सुहास पुंडे, रवि वानखेडे, गजानन लक्षणे, बंडु लक्षणे, राजेंद्र लक्षणे, दिनकर लक्षणे, नंदलाल लक्षणे, पवन लक्षणे, श्याम केजरकर, चंद्रकांत लक्षणे, माला राजुरकर, बबिता लक्षणे, संगिता चौधरी, छबु नांदुरकर, शोबा येसकर, वंदना लक्षणे, पुनम शेंडे आदीसह नाभिक एकता मंच खंडाळा (घटा टे), न्हावी समाजबांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




